नाथपंथी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे असे निवेदन अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीश पवार व नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना केले
![]() |
नाथपंथी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे |
सध्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे परंतु या मध्ये एकूण २८ ते २ ९ जातींचा समावेश आहे . या महामंडळाला शासनाकडून निधी प्राप्त होत नाही . निधी मंजूर झाला तर तो अल्प प्रमाणात असतो . त्यामुळे या समाजातील लोकांना त्याचा लाभ होत नाही . या समाजाच्या प्रगतीसाठी , उन्नतीसाठी , स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे . आमदार गणेश नाईक अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला आणल्याचे ही पवार यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले .
त्यास अनुसरून नाथजोगी , नाथपंथी , डवरी गोसावी , गोंधळी , समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली या शिष्टमंडळात सोपान नलावडे , चंद्रकांत गावडे , संतोष कासार , संगिता पवार , गोरख वंजारी , शशिकांत जाधव आदींचा समावेश होता
स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक जि्ह्यातील समाजातिल दुर्लक्षीत घटकाला याचा फायदा होईल